तुटलेल्या पुलावरून पाय घसरल्याने तरुण पुरात वाहून गेला

गेवराई दि.26 : तुटलेल्या पुलावरून प्रवास करताना अचानक पूल तुटल्याने पुरात तरुण वाहून गेला. ही घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे रविवारी (दि.26) सकाळी घडली.सुदर्शन संदिपान संत (वय 37) गेवराई तालुक्यातील भोजगाव गावालगत असलेल्या अमृता नदीवरील पूल वाहून गेल्याने कठाड्यावरून नदी पार करताना गावातील सुदर्शन हा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सकाळी 9 वाजता घडली. या […]

Continue Reading

प्राचार्या भारती बांगर यांचे निधन

गेवराई दि.7 : शहरातील इंदिरा गांधी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या भारती बांगर यांचे मंगळवारी (दि.7) पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे तालुक्यात सर्वत्र सुपरिचित होत्या त्यामुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भारती बांगर (वय 70) यांचे बीड जिल्ह्यामध्ये मोठे नाव लौकिक होते. त्यांनी इंग्रजी माध्यमाची गेवराई तालुक्यात पहिली शाळा सुरू करून तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये […]

Continue Reading
corona pecaint suicide

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

गेवराई दि.6 : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील रेवकी येथे रविवारी सकाळी घडली.भागवत आसाराम चोरमले (वय 26 रा.रेवकी ता.गेवराई) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने रविवारी (दि.7) रेवकी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे बँकेचे कर्ज होते. घटनास्थळी गेवराई पोलिसांनी धाव घेतली असून या […]

Continue Reading

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने शेतकऱ्यास चिरडले; नातेवाईकांचा आक्रोश

गेवराई : सकाळी शेतामध्ये जात असलेल्या शेतकऱ्यास अज्ञात वाळूच्या हायवा टिप्परने चिरडले. नातेवाईकांनी मृतद्देह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. घटनास्थळी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ही घटना सोमवारी सकाळी 6.30 च्या दरम्यान घडली. गंगावाडी येथील शेतकरी रुस्तुम मते (वय 60) हे सकाळी 6.30 च्या दरम्यान आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना राक्षस भुवन येथून अवैधरित्या […]

Continue Reading

शासकीय योजनेतील पैसे न मिळाल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

बीड. दि.18 : शासकीय योजनेतील पैसे न मिळाल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.बीड जिल्ह्यातील राक्षस भुवन येथील धक्कादायक घटना घडली आहे. बाळासाहेब ज्ञानोबा मस्के (वय-42) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. ‘मायबाप सरकार मी आत्महत्या करीत आहे शासकीय योजनेतील पैसे मिळाले नसल्याने कर्जबाजारी झालो तर प्रिय बंधू नाना व आप्पा माझी दोन मुलं आहेत. […]

Continue Reading
lal pari gevrai bus stand

लालपरी तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा सुरु

गेवराई आगारातून बीड, औरंगाबाद, पैठण आगाराच्या बसेस धावल्या गेवराई, दि.20 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक गुरुवार पासून सुरु झाली. सर्वसामान्यांची लालपरी तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा रस्त्यावर धावल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेवराई आगारातून पहिल्या दिवशी बससेवेला प्रवाशांचा अल्पसा प्रतिसाद मिळाला. परंतू हळूहळू प्रवाशी संख्येत […]

Continue Reading
BHAGR VISHBADHA

भगर खाल्ल्याने साठ ते सत्तर जणांना विषबाधा; आकडा वाढण्याची शक्यता

गेवराई तालुक्यातील तळणेवाडीतील घटनाबाधीतांना गेवराई, बीडमध्ये उपचार बीड, दि.11 : गोकुळाष्टमीला उपवासाची भगर खाल्याने तब्बल साठ ते सत्तर जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला असून तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ज्यांनी ज्यांनी ही भगर खाल्ली त्यांना उलटी, मळमळ होऊ लागल्याने गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही रुग्णांना बीड रुग्णालयात रेफर […]

Continue Reading
corona

गेवराईत निघाले 28 ‘सुपर स्प्रेडर’

बहुतांश व्यापार्‍यांचा समावेश गेवराई, दि.5 : गेवराईत शहरात भिलवाडा पॅटर्न राबविण्यास सुरुवात केल्यानंतर तब्बल 28 जण सुपर स्प्रेडर असल्याचे आढळून आले. शहरात दिवसभरात 1310 जणांच्या अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यात ही धक्कादायक बाबा आढळून आली. गेवराई शहरातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह 6 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारपासून शहरातील व्यापारी, फेरीवाले, दुधवाले व […]

Continue Reading
pooja more

15 व्या वित्त आयोगाचा 10 टक्के निधी खर्चाचा पं.स.सदस्यांना अधिकार

गेवराईच्या पंचायत समिती सदस्य पुजा मोरे यांची माहिती बीड, दि. 22 : जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांना कुठलाच हक्काचा निधी नसल्याने हे सदस्य केवळ नावापुरते होते. पण आता या सदस्यांना हक्काचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक अध्यादेश काढून 15 व्या वित्त आयोगातून जिल्ह्याला मिळणार्‍या निधीत 10 […]

Continue Reading