शासकीय योजनेतील पैसे न मिळाल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड. दि.18 : शासकीय योजनेतील पैसे न मिळाल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.
बीड जिल्ह्यातील राक्षस भुवन येथील धक्कादायक घटना घडली आहे. बाळासाहेब ज्ञानोबा मस्के (वय-42) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. ‘मायबाप सरकार मी आत्महत्या करीत आहे शासकीय योजनेतील पैसे मिळाले नसल्याने कर्जबाजारी झालो तर प्रिय बंधू नाना व आप्पा माझी दोन मुलं आहेत. त्यांना तुमच्या मुलाप्रमाणे सांभाळा, मी जात आहे मला माफ करा.’ असं बाळासाहेब मस्के यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलं आहे.

Tagged