corona possitive

नगर परिषदेच्या अधिकार्‍याला कोरोनाची लागण

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

केज, दि. 20 : तालुक्यात सोमवारी कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. यात येथील नगरपालिका विभागातील एका अधिकार्‍याचा समावेश आहे. त्या अधिकार्‍याकडे माजलगाव येथील पदाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे ते अनेकांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे केज, माजलगाव न.प. प्रशासनात खळबळ उडाली आहे. याशिवाय हे अधिकारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास प्रशासनातही येऊन गेल्याने आता हा विभाग बंद करण्यात आला आहे.

केज तालुक्यात आज आढळून आलेल्या पाच पॉझिटिव्ह रुग्णामध्ये होळ येथील पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातून तिघांना तर कळंबअंबा येथील एकजण अशा चौघांना बाधा झाली आहे. यात पुर्वी पॉझिटिव्ह आलेल्या महाराजांच्या संपर्कातील वारकरी, चालकांचा समावेश आहे. तसेच, केज येथील नगरपालिकेतील एका अधिकार्‍याचाही रुग्णात समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांचा केज तालुका आरोग्य विभागाकडून शोध सुरु आहे. याशिवाय त्या अधिकार्‍याकडे माजलगाव येथील न.प.प्रशासनाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे ते माजलगावच्या कार्यालयात देखील काही कर्मचारी, अधिकार्‍यांसह पदाधिकार्‍यांच्या संपर्कात आल्याची दाट शक्यता आहे. याचा आरोग्य विभागाकडून शोध सुरु झाला आहे.

Tagged