6 मे पासून सुरु होणार लसीकरण
बीड -गेले अनेक दिवस जिल्ह्यात लसीकरण बंद होते. मात्र आता पुन्हा एकदा लसीकरण सुरु होत असून बीड जिल्ह्यात 44 हजार 500 लस प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी अधिकृत प्रेसनोट द्वारे दिली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी ताटकळत असलेल्या सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. 45 ते त्यापुढील वयोगटात सर्व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु असणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्राला प्रत्येकी 600 लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 6 मेपासून हे लसीकरण पुन्हा एकदा सुरु होत आहे.
18 ते 45 वयोगटालाही मिळणार लस
18 ते 45 वयोगटातील लोकांनाही आता जिल्ह्यात लस मिळणार आहे. त्यासाठी केंद्र देखील वाढविण्यात आली आहेत. गेवराई, बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी आणि केज या ठिकाणी त्यांना लस घेता येईल.
कुठल्या कुठल्या केंद्रावर मिळणार लस? पीडीएफ फाईल पहा व सर्व सुचना काळजीपुर्वक वाचा…