ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागन

कोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे मराठवाडा महाराष्ट्र

बच्चन कुटूंबीयांवर कोरोनाच सकंट

मुंबई : अमिताभ व अभिषेक यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर जया बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या यांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने बच्चन कुटुंबाला थोडा दिलासा मिळाला. मात्र दुसर्‍या चाचणीमध्ये ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. 

      अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्याने त्यांचे लाखो चाहते काळजीत पडले आहेत. अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्वत: आपल्या आजारपणाबाबत माहिती देत संभ्रम वाढू दिलेला नाही. अमिताभ यांना शनिवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर काही तासांनी रात्री 10 वाजून 52 मिनिटांनी त्यांनी ट्विट केलं व तपशील दिला. ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने संबंधित यंत्रणांना याबाबत कळवलं आहे. घरातील अन्य सदस्य आणि स्टाफचे स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, असे नमूद करतानाच अमिताभ यांनी संपर्कातील अन्य व्यक्तींनाही आवाहन केलं आहे. गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया करोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती अमिताभ यांनी केली आहे. अमिताभ यांच्या या ट्विटनंतर काही वेळातच अभिषेक बच्चनचा करोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त धडकले. त्यानंतर ऐश्वर्या, आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. बच्चन कुटुंबीयांवर करोनाचं संकट कोसळल्यानंतर त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देशभरातून प्रार्थना होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी अमिताभ यांना लवकरात लवकर आराम पडावा अशी प्रार्थना केली.

Tagged