vivah sohala

विवाह सोहळ्यासाठी आता फक्त दहा लोकांची परवानगी

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

त्यासाठी असणार आहेत या अटी

बीड : या पुर्वी विवाह सोहळ्यासाठी पन्नास लोकांच्या उपस्थितीला परवानगी होती. पंरतु कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहून आता विवाह सोहळ्यासाठी फक्त दहा लोकांची परवानगी असणार आहे. 

       विवाह सोहळ्यासाठी दहा लोकांची परवानगी देण्यात आली. ही परवानगी देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या अटीवर देण्यात येणार आहे. प्रत्येक विवाह सोहळ्याची माहिती लेखी स्वरुपात किमान तीन दिवस अगोदर आयोजकांनी संबधित पोलीस ठाण्यास आणि ग्रामपंचायत/ नगर परिषद/नगर पंचायत यांना लेखी स्वरुपात देणे बंधणकारक आहे. विवाह सोहळ्यामध्ये नियमांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी मुख्याधिकारी/ग्रामसेवक यांची राहिल. असे आदेश दि.12 जुलै 2020 रोजी पासून निर्देशित करण्यात आले आहेत. अशी माहिती अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.

Tagged