corona vaccine

लस निर्मितीमध्ये रशियाने मारली बाजी

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

जगासाठी खुशखबर : सर्व मानवी चाचण्याही यशस्वी झाल्याचा दावा

वृत्तसंस्था । नवी दिल्ली

दि.12 : संपूर्ण जग ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पहात होते तो क्षण आता आला आहे. रशियाने आपण पहिली लस तयार केल्याचा दावा केला असून त्याच्या सर्व चाचणी देखील यशस्वी झाल्या आहेत. हा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावर खरा उतरल्यास जगाची या संकटातून सुटका होण्याचं दिशेनं पडलेले हे पहिलं पाऊल असेल. एएनआयनेे हे वृत्त दिले आहे.

 

इंस्टीट्यूट फॉर ट्रान्सलेशन मेडिसिन अँड बायोटेक्नोलॉजीचे अधिकारी वदिम तरासोव यांनी याबाबत माहिती दिली. सेचेनोव विश्वविद्यालयाने 18 जूनला लसीची चाचणी सुरू केली होती. या लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. स्वयंसेवकांवर याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे, असेही वदिम तरासोव यांनी सांगितले. 

जगभरात कोरोनावर लस शोधण्यासाठी 80हून अधिक गट कामाला लागलेले आहेत. भारतात भारत बायोटेक या कंपनीने कोव्हॅक्सिन नावाची लस तयार केली असून 15 ऑगस्टपुर्वी ती बाजारात आणण्याचे प्रयत्न भारत सरकारकडून सुरु सुरु आहेत. तर प्रसिध्द सिरम कंपनीने ऑक्सफोर्डसोबत करार केला असून त्यांच्या लसची क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. पुढील सहा महिन्यात आमची लस बाजारात असेल असे सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी सांगितले.

लवकरच बाजारात आणणार

russia sechenov university सेचेनोव विश्वविद्यालयाच्या इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल पैरासिटोलॉजी, ट्रॉपिकल अँड वेक्टर-बॉर्न डिजीजचे प्रमुख अलेक्जेंडर लुकाशेव यांनी कोविड-19 वरील लसीची यशस्वी चाचणी घेतल्याचे सांगितले. तसेच लवकरच ही लस बाजारात उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. ज्या स्वयंसेवकांवर याचे परीक्षण करण्यात आले त्यांना 20 जून रोजी डिस्चार्ज देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

मॉडर्नाची फेज 3 ट्रायल सुरु होणार

मॉडर्ना कंपीनीही याच महिन्यात 30 हजार लोकांना कोरोनाची लस टोचणार आहे. त्यांची ही चाचणी यशस्वी झाली तर जग कोरोनातून मुक्त होण्यास आणखी एक पाऊल पडले म्हणावे लागेल. 18 मे रोजी मॉडर्नाने फेज 1 मधील ट्रायल सकारात्मकरित्या पूर्ण केली होती. जुलैमध्ये फेज 3 ट्रायल होणार असल्याचे कंपनीने सांगितले होते.