atamahatya

कंकालेश्वरच्या कुंडात उडी घेवून मुलीची आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.10 : शहरातील कंकालेश्वर मंदिराच्या कुंडात उडी घेवून एका 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.10) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
सायली अशोक उगले (वय 16) असे मयत मुलीचे नाव आहे. शहरातील कंकालेश्वर मंदिर परिसरातील कुंडामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पेठ बीड ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदर मुलीने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी पेठ बीड ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tagged