accident

कोविड सेंटरमधील कर्मचार्‍याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

अंबाजोगाई कोरोना अपडेट क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


’स्वाराती’ मध्ये उपचार न मिळाल्याने मृत्यू-नातेवाईक

अंबाजोगाई दि.10 : लोखंडी सावरगाव येथील कोवीड केअर हॉस्पिटल मध्ये इलेक्ट्रेशियन म्हणून नौकरीस असलेल्या युवकाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. दरम्यान या युवकास उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आल्यानंतर त्यांचेवर योग्य उपचार मिळाले नसल्याचा आरोप करीत त्याच्या नातेवाईकांनी स्वारातीतील 2 सुरक्षा रक्षकास आणि उपचार करणार्‍या दोन डॉक्टरांना मारहाण केली असल्याची चर्चा असून या मारहाणीस सिनियर वैद्यकीय अधिकारी यांनी दुजोरा दिला आहे.
गणेश वैजनाथ मुंडे (वय 26) हा तरुण लोखंडी सावरगाव येथील कोवीड केअर सेंटरमध्ये हंगामी स्वरुपात इलेक्ट्रिशिएन म्हणून काम करत होता. आपली 8 पर्यंतची ड्युटी आटोपून गावाकडे जाण्यासाठी लोखंडी सावरगाव येथील टी पॉइंट वर वाहनांची वाट पहात रस्त्यावर उभा होता. यावेळी लातुरकडे जाणार्‍या अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेने गणेश गंभीर स्वरुपात जखमी झाला. गणेश यास तातडीने उपचारासाठी येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. बाह्य रुग्ण विभागात उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी गणेश यांचेवर प्राथमिक उपचार करुन त्यास तातडीने हायर सेंटरला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. गणेश यास नातेवाईकांनी इतरत्र घेऊन जात असताना त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यास पुन्हा स्वारातीत उपचारासाठी आणण्यात आले. यानंतर उपचार सुरु असतांनाच कांही वेळात गणेशाचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त नातेवाईकांनी गणेश यास योग्य उपचार मिळाले नाहीत असा आरोप करीत स्वाराती रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागासमोर राडा करीत उपस्थित असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांना मारहाण करीत बाह्य रुग्ण विभागात प्रवेश मिळवला व उपचार करणा-या डॉक्टरांसोबत हातापायी केली. ही माहिती रुग्णालय विभागातील सिनियर वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश आब्दागिरे, डॉ. प्रमोद दोडे, डॉ. सुमित वाघमारे, डॉ. नील वर्मा यांनी अत्यंत संयम ठेवत मयताच्या नातेवाईकांना सर्व परिस्थिती आणि वैद्यकीय हतबलता सांगितली तरीही नातेवाईकांनी बराच वेळ राडा घातला.

Tagged