पुन्हा 3 कोरोनाबळी; दीडशे रूग्णांची भर

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचे सत्र कायम आहे. मंगळवारी पुन्हा 3 रूग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. तसेच 150 नवे रूग्ण आढळले तर 137 कोरोनामुक्त झाले. त्यांना रूग्णालयातून घरी पाठविण्यात आले. दरम्यान सक्रीय रूग्णांचा आकडा दोन हजार पार गेला आहे. त्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात कोरोना संशयित असलेल्या 4 हजार 445 लोकांची चाचणी करण्यात आली होती. यातील 4 हजार 295 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर 150 जण पॉझिटिव्ह आढळले. यात अंबाजोगाई तालुक्यातील 4, आष्टी 26, बीड 47, धारूर 6, गेवराई 8, केज 13, माजलगाव 7, परळी 1, पाटोदा 13, शिरूर 10, वडवणी 12 येथील रूग्णांचा समावेश आहे. तसेच, जुन्या एकासह 3 मृत्यूची नोंद झाली. यामध्ये 27 वर्षीय पुरुष (रा.गोपाळपूर ता.धारूर), 43 वर्षीय महिला (रा.अजीजपुरा, केज), 75 वर्षीय पुरुष (रा.माकेगाव ता.अंबाजोगाई) या तिघांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांचा आकडा 99 हजार 064 एवढा झाला आहे. पैकी 94 हजार 372 कोरोनामुक्त झाले असून 2 हजार 653 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 039 रूग्ण उपचार घेत आहेत. साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.

Tagged