sudam munde

डॉ.सुदाम मुंडेच्या कोठडीत वाढ

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड मराठवाडा

 परळी  :  विनापरवाना हॉस्पिटल चालविल्या वरून गुन्हा दाखल झालेल्या डॉ. सुदाम मुंडे याला 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी शुक्रवारी परळी न्यायालयाने सुनावली. यापूर्वी पाच दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी हजर केले असता 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
डॉ.डॉक्टर सुदाम मुंडे याने परवानगी नसतानाही परळी येथे हॉस्पिटल सुरू केले होते. विशेष म्हणजे 2012 मध्ये डॉक्टर सुदाम मुंडे याला स्त्री भ्रूण हत्या प्रकरणात दहा वर्षाची शिक्षा सुनावली होती. मधल्या काळात जामीनवर बाहेर आल्यानंतर डॉ. सुदाम मुंडे याने पुन्हा विनापरवाना परळी येथे आपला दवाखाना सुरू केला होता. याची माहिती जिल्हा प्रशासनाला, आरोग्य विभागाला मिळताच सुदाम मुंडे याच्या विनापरवाना हॉस्पिटल वर छापा टाकला असता गर्भपाताची गर्भपातासाठी लागणारी साहित्य व गोळ्या औषधांचा साठा आढळून आला होता. या प्रकरणात पोलिसांनी डॉक्टर सुदाम मुंडे याला दुसर्‍यांना न्यायालयात हजर केले असता त्याला 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी दिली. ठोस पुरावे न्यायालयात सादर करता यावेत यासाठी पोलीस डॉ. सुदाम मुंडे यांची कसून चौकशी करत आहेत. पुन्हा दुसर्‍यांदा पोलिसांनी चार दिवसाची कोठडी मागितली होती, त्यानुसार न्यायालयाने आदेश दिले आहेत.

Tagged