kaij-shekap

वन अधिकार्‍यांच्या कार्यालयात थेट रानडुक्कर सोडण्याचाच इशारा

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात अनेक तालुक्यात रानडुकराने हैदोस घातला आहे. त्यामुळे शेतकरी वैतागले असून मोठ्या प्रमाणावर रानडुक्करांची संख्या वाढली आहे. वारंवार मागणी करुनही रानडुक्करांचा बंदोबस्त करण्यात येत नाही. त्यामुळे आता तातडीने कार्यवाही न केल्यास बीडच्या वन विभागाच्या अधिकार्‍यांच्या कार्यालयात रानडुक्कर सोडू असा सणसणीत इशारा शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा चिटणीस तथा शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे दिले आहे.

निवेदनात पुढे म्हटले की, बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांवर रानडुक्कर हल्ले करत आहे. अनेक शेतकरी जखमी देखील झालेले आहेत. रानडुक्कर वीस ते पंचवीस टोळीने शेतामध्ये घुसतात, जमीन उध्वस्त करून पिकाचे नुकसान करतात. शेतकर्‍याच्या हाता-तोंडाशी आलेला घास नुकसान झाल्याने जात आहे. रानडुक्कर पकडण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नेमून तात्काळ रानडुक्करांना बंदिस्त करावा अन्यथा बीडच्या वनविभागाच्या अधिकार्‍यांच्या कार्यालयात शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने रानडुक्कर सोडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शेतकरी नेते भाई मोहन गुंड, भाई संग्राम तुपे, भाई नारायण गोले, भाई दत्ता प्रभाळे, भीमराव कुटे, मंगेश देशमुख, अर्जुन सोनवणे, प्रवीण ज्ञानेश्वर गवते, दिनकर रिंगणे, सुनील रिंगणे, हनुमान शिंदे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Tagged