kaij-aadaskar

पंकजाताई मुंडे यांच्यामुळे डीसीसी बँकेची प्रगती-ऋषिकेश आडसकर

केज न्यूज ऑफ द डे राजकारण शेती

केज : बीडची डीसीसी बँक पूर्णतः डबघाईला आली होती. या बँकेचे सभासद देखील अस्वस्थ असायचे. माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने सभासदांचा विश्वास संपादन केला. ताईंच्या मार्गदर्शनाखाली आज बँकेची मोठी प्रगती झाली असून सक्षमरित्या शेतकर्‍यांना आज कर्ज वितरण सुरु आहे. तसेच शेतकर्‍यांना किसान कार्ड वाटप करुन या माध्यमातून व्यवहारात गतीमानता आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे प्रतिपादन डीसीसी बँकेचे संचालक तथा केज पं.स.चे उपसभापती ऋषिकेश आडसकर यांनी केले आहे.

   केज तालुक्यातील सांगवी (सा.) येथील सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत सभासदांना कर्ज व 104 शेतकर्‍यांना किसान कार्डचे (एटीएम कार्ड) वाटप  शुक्रवारी (दि.11) करण्यात आले. यावेळी ऋषिकेश आडसकर हे बोलत होते. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी डीसीसीचे संचालक तथा उपसभापती ऋषिकेश आडसकर, जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.वसुदेव नेहरकर, जेष्ठ नेते वसंत केदार, केजचे नगरसेवक सुशील अंधारे, डीसीसी बँकेचे शाखाधिकारी आण्णासाहेब पिंगळे, दैठणाचे सरपंच अंगद मुळे, शिरुर घाटचे सरपंच मच्छिंद्र सांगळे, पिठीघाटचे सरपंच रामराजे तांबडे, सारणीचे माजी सरपंच श्रीकांत भांगे, सांगवीचे सरपंच प्रल्हाद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

  पुढे बोलताना ऋषिकेश आडसकर म्हणाले, कोरोना काळात शेतकर्‍यांची फरफट होत होती. त्यामुळे शेतकर्‍यांना व्यवहार करताना सुलभता मिळावी. त्यांचा वेळ वाचावा आणि हेळसांड थांबावी या उद्देशनाने एटीएमचे आता गावात जाऊन बँक वाटप करत आहेत. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बँकेची व शेतकर्‍यांची प्रगती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे ते म्हणाले. यावेळी विजयकांत मुंडे, डॉ.वसुदेव नेहरकर, वसंत केदार आदींनी भाषणे केली. कार्यक्रमाचे आयेाजन सांगवीच्या सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा भाजप तालुकाध्यक्ष भगवान केदार, व्हाईस चेअरमन वसंत धस यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिव रमेश खाडे, महादेव केदार, हनुमंत केदार, नारायण चाळक, मच्छिंद्र धस, मसुदेव दराडे, रामकृष्ण केदार, रविंद्र केदार, शंकर गायकवाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्तावीक भगवान केदार यांनी केले तर सचिव रमेश खाडे यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

सेवा सहकारी सोसायटी शेतकर्‍यांचा कणा -भगवान केदार
सेवा सहकारी सोसायटी हा शेतकर्‍यांचा कणा आहे. ही संस्था शेतकर्‍यांची आहे. तालुक्यात आपण उत्तम काम केले आहे. संस्थेच्या सभासदांना यापूर्वी अनेकवेळा पिक कर्ज वाटप केले. तसेच, हजारावर व्यवहार असलेल्या संस्थेचे आता कोटीवर व्यवहार गेले आहेत. सभासदांचा विश्वास संपादन केला. शेतकर्‍यांच्या हितासाठी प्रयत्न करत आहोत, गावातील प्रत्येक सभासदास कर्ज देण्यात आले. यापुढेही असेच काम करत राहणार आहे, भाजप तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनी प्रास्ताविकात सांगितले.

Tagged