परळीतून 140 गाढवे चोरी!

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड

परळी दि.30 : दुचाकी, मोबाईल सह इतर चोरीच्या घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र परळी शहरातून चक्क 140 गाढवे चोरी गेले आहेत. यामुळे शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
परळी शहरात वीटभट्टीसह इतर कामांसाठी भोई, बेलदार व वडार यांच्याकडे गाढवे आहेत. मात्र मागील पंधरादिवसांपासून एक एक करत तब्बल 140 गाढवे चोरी गेली आहेत. या संदर्भात संभाजीनगर पोलीस ठाण्यात गाढवांच्या मालकांनी धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. दरम्यान काम नसले की, ही गाढवे सोडून शहरात सोडून देतात. जेव्हा कामाची गरज लागेल तेव्हा त्यांचा शोध घेतात. त्यामुळे त्यांनी गाढवांची खरेदी कुणाकडे केली होती? व त्याचे दाखले मिळाल्यास गाढवे शोधण्यासाठी मदत होईल. त्या मदतीच्या आधारे शोध घेतला जाईल. तसेच गाढवांचा शोध सुरु असल्याची माहिती संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चाटे यांनी दिली.

Tagged