लहान मुलांचेही होणार लसीकरण!

कोरोना अपडेट क्राईम देश विदेश न्यूज ऑफ द डे


3 जानेवारीपासून लसीकरण सुरु
भारतातील लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लहान मुलांनाही कोरोना लस मिळणार आहे. भारत बायोटेकची लस लहान मुलांना देण्यासाठी मोदी सरकारने परवानगी दिली आहे. ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने लहान मुलांसाठी भारत बायोटेकच्या लशीला हिरवा कंदील दिला आहे. 3 जानेवारीपासून या लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस ही सध्या देशात दिली जात आहे. सध्या 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं लसीकरण होतं आहे. लहान मुलांनाही लवकरात लवकर लस मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीची लहान मुलांवर चाचणी सुरू करण्यात आली. आता ही लस लहान मुलांना देण्यास परवानगी देण्यात आली आहे. 12 ते 18 वयोगटातील मुलांवर या लशीच्या आपात्कालीन वापराला डीजीसीआयने परवानगी दिली आहे. मेदांताचे मॅनेजिंग डायरेक्टर नरेश त्रेहान म्हणाले, ओमिक्रॉन वेगाने पसरतो आहे. त्यामुळे लहान मुलांनाही कोरोना लस दिली जाणार हा खूप मोठा दिलासा आहे. कोव्हॅक्सिन ही भारत बायोटेक आयसीएमआर आणि एनआयव्ही या संस्थांनी पूर्णतः भारतातच तयार केलेली लस आहे. ही लस पारंपरिक इनअ‍ॅक्टिव्हेटेड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. म्हणजेच यातून मृत व्हायरस शरीरात सोडला जातो. त्यातून अ‍ॅन्टीबॉडी प्रतिसादाला चालना मिळते. विषाणू ओळखून त्याला विरोध करण्यासाठी अ‍ॅन्टीबॉडी तयार केल्या जातात. कोव्हॅक्सिन लशीचे दोन डोस चार ते सहा आठवड्यांच्या अंतराने घ्यावे लागतात. त्यामुळे आता लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे.


आरोग्य कर्मचार्‍यांना बूस्टर डोस
पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य कर्मचार्‍यांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. 10 जानेवारीपासून याची सुरुवात होणार आहे. तसंच 60 वर्षावरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असल्याचेही म्हटले आहे.

Tagged