झाडाखाली थांबलेल्या महिलेचा वीज पडून मृत्यू तर तिघे गंभीर

केज क्राईम न्यूज ऑफ द डे शिरूर


केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील घटना
केज दि.31 : शेतातून घरी येत असताना अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे झाडाखाली शेतकरी कुटूंब झाडाखाली थांबले. यावेळी वीज पडून महिलेचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीज जखमी झाले आहेत. ही दुर्देवी घटना केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे बुधवारी(दि.31) सायंकाळी घडली.

केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील आत्माराम माणिक आगे, अन्नपूर्णा आत्माराम आगे, रामरतन चंद्रकांत आगे आणि शिला रामरतन आगे हे शेतकरी कुटुंब शेतात होते. सायंकाळच्या सुमारास अचानक काळेगाव शिवारात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. म्हणून हे कुटूंब एका झाडाखाली थांबले. यावेळी वीज कोसळली. यात शिला रामरतन आगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे ही भाजले असून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी केज ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

जेधेवाडीत घरावर वीज पडून म्हैस
ठार तर पतीपत्नी बालंबाल बचावले
जाटनांदूर :
शिरुर तालुक्यातील जाटनांदूर येथे बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. जाटनांदूरसह परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत होता. यावेळी जेधेवाडी येथील रावसाहेब गणपत जेधे यांच्या घरावर वीज पडली. यामध्ये म्हैस जागीच ठार झाली. तर घरातील रावसाहेब जेधे व त्यांच्या पत्नी बालंबाल बचावल्या.

Tagged