नगरपालिका निवडणूक कार्यक्रम स्थगित

नगर पंचायत निवडणूक 2022 न्यूज ऑफ द डे बीड

राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

बीड : ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सध्या चालू असलेला राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. याबाबतच्या आदेश राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने ८ जुलै रोजी १८ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा व चार नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रत्यक्ष कार्यक्रम दिला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण प्रश्न सुनावणी सुरू आहे. पुढील सुनावणी १९ जुलै रोजी ठेवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेला निवडणुकांचा कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहे. तसेच सदर निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे वरील क्षेत्रातील जाहीर करण्यात आलेली आचारसंहिता लागू राहणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.