नगराध्यक्ष, सरपंचाची थेट निवड होणार

न्यूज ऑफ द डे राजकारण


बीड दि.14 : नगराध्यक्ष आणि सरपंचाची निवड आता थेट जनतेतून करण्याचा निर्णय धेतला असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन्ही लढती जनतेतून होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

या शिवाय बाजार समितीच्या निवडणुकीत देखील शेतकर्‍यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. आणिबाणीच्या काळात कारवास भोगलेल्यांसाठी सन्मान योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय देखील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.
या शिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पेट्रोलमध्ये 5 रुपयांची तर डिझेलमध्ये तीन रुपयांची कपात करण्यात आली आहे. बुलेट ट्रेन संदर्भातील सर्व मान्यता देखील देवून टाकल्या असल्याचेही शिंदे आणि फडणवीस यांनी सांगितले.

Tagged