devendra fadnavis

देवेंद्र फडणवीस रातोरात दिल्लीत दाखल; संजय राऊत म्हणाले

न्यूज ऑफ द डे राजकारण

बीड, दि.21: या सगळ्या प्रकरणानंतर आता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची अधिकृत भुमिका स्पष्ट केले. पण तत्पुर्वी आता देवेंद्र फडणवीस हे रातोरात दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. पक्षाच्या वरीष्टांच्या त्यांच्या बैठका सुरु आहेत. विशेष म्हणजे शरद पवार हे देखील दिल्लीत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
काय म्हणाले संजय राऊत

  • अनिल परब यांना समन्स पाठवून आज ईडीने बोलावून घेतले. कारण अशा क्षणी ते आमच्यासोबत राहू नये, हीच भाजपाची खेळी.
  • एकनाथ शिंदे हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते कडवट निर्णय घेणार नाहीत.
  • एकनाथ शिंदे यांच्याशी अद्याप आमचा संपर्क झालेला नाही. त्यामुळे आताच त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही.
  • शरद पवार आणि उध्दव ठाकरे सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आहेत.
  • भाजपचं सर्वात मोठं षडयंत्र
  • आमचे सगळे आमदार हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते सर्वजण शिवसेनेच्या वाईट काळातही सोबत होते. आता तर चांगला काळ आहे.
  • बंड करणार्‍यांना आगोदर शिवसैनिकांशी भिडावं लागेल. त्यानंतर मग आमच्याशी
  • काही आमदारांना फूस लावून सोबत नेण्यात आलेले आहे.
  • ज्या पध्दतीने सगळे सुरत मध्ये गेले ते पाहता तिथे कोणाची सत्ता आहे आणि ते कशा पध्दतीने त्यांना प्रोटेक्ट करीत आहेत हे तुम्हा सगळ्यांना दिसत आहे.

काही ठळक घडामोडी

  • अजित पवार आणि जयंत पाटील थोडड्याच वेळात मंत्रालयात ऐकमेकांची भेट घेणार
  • मुख्यमंत्र्यांकडून थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी बैठक
  • एकनाथ शिंदे यांच्यासोबत 25 हून अधिक आमदार आणि 4 ते पाच मंत्री असल्याची माहिती.
  • दादा भुसे, संदीपान भुमरे, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार आणि स्वतः एकनाथ शिंदे असे पाच मंत्री शिवसेनच्या मुंबईतील कुठल्याही नेत्यांच्या संपर्कात नाहीत. हे सर्वजण गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.
  • फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर काल रात्रंभर बैठका चालल्या आहेत. त्यानंतर फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
    मराठवाड्यातील सहा आमदार त्यातील दोन मंत्री, विदर्भातील 4 आमदार, पश्चिम महाराष्ट्रातील पाच आमदार त्यात गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई, साताराचे कोरेगावचे महेश शिंदे यांचा समावेश आहे.
  • अपक्ष आमदार गिता जैन म्हणाल्या आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण आपला निर्णय जाहीर करू, असे त्यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहेत.

– शिवसेनेच्या दुपारी होणार्‍या बैठकीमध्ये आपण मुंबईत हजर राहू अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी थोडड्याच वेळापुर्वी स्पष्ट केले आहे. मी इतर कोणाच्याही संपर्कात नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस राष्ट्रवादीसोबत असलेलं सरकार आम्हाला मान्य नसल्याची थेट भुमीका एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांनी घेतली आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेनेसोबतच राहू, अडीच वर्षांचा घरोबा आता पूर्ण झालाय. त्यामुळे आता काँग्रेस राष्ट्रवादी सोबत नको, अशी आमदारांनी भुमिका घेतल्याची माहिती आहे. आतापर्यंत 19 आमदार आयडेटीफाय झाले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेचं सरकार येणार अशी मोठी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शिवसेनेतील या आमदारांचा रोष शिवसेना पक्ष प्रमुखांवर देखील आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ग्रामीण भागातील आमदारांना वेळ देत नाहीत. ते केवळ महानगरातील आमदारांशी संपर्कात असतात, त्यामुळे शिवसेनेत मोठं बंड होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

शवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी रातोरात बंड केल्यानंतर आता त्यांच्यासोबत मराठवाड्यातील सहा आमदार आणि दोन मंत्री असल्याची माहिती मिळत आहे. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जालन्याने अर्जुन खोतकर हे सुध्दा असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय शिवसेनेच्या अनेक पदाधिकार्‍यांना आमच्याकडे या अशा आशयाचे निरोप मिळण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात शिवसेनेची वाताहत होण्याची शक्यता आहे.

Tagged