मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने राज्यात राजकीय भूकंप आला आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला असताना एकनाथ शिंदे अचानक बेपत्ता झाले असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान शिंदे यांच्यासोबत २५ आमदार असल्याची चर्चा असली तरी तूर्तास काही आमदारांची नावे समोर आली आहेत.
शिवसेना फुटण्याच्या मार्गावर
एकनाथ शिंदेंसोबत कोण आमदार आहेत?
-संजय राठोड एकनाथ शिंदेंसोबत असल्याची माहिती आहे.
-अपक्ष आमदार जयस्वाल (रामटेक)
-तानाजी सावंत (उस्मानाबाद)
-ज्ञानराज चौघुले (उस्मानाबाद)
-यवतमाळचे पालकमंत्री भुमरे
-शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)
-विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम)
-बालाजी किणीकर (अंबरनाथ)
-भरत गोगावले (महाड)
-महेंद्र दळवी (अलिबाग)
-महेंद्र थोरवे (कर्जत)
-कृषिमंत्री दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचेही फोन बंद आहेत.
-सांगोल्याचे ॲड. शहाजीबापू पाटील पूर्वीपासून भाजपाच्या संपर्कात होते. ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.
-खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांचाही सहभाग असल्याची माहिती. काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील खदखद त्यांनी मांडली होती.
-कोल्हापूरचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत.
-प्रताप सरनाईक यांच्याविषयी संभ्रम कायम आहे
-ठाकरे सरकार कोसळलं आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आलं तर करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे हे भाजपाला पाठिंबा देऊ शकतात.