tiktok star santosh munde

टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा santosh munde करंट लागून मृत्यू

क्राईम धारूर न्यूज ऑफ द डे बीड

  • डीपीचे फ्यूज टाकताना अन्य एकाचाही मृत्यू
    प्रतिनिधी । धारूर

    दि.13 : धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील संतोष मुंडे tiktok star santosh mundeहा तरुण टिक टॉक स्टार म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे. त्याचा आणि त्याच्यासह बाबुराव मुंडे याचा शेतातील विजेचा गेलेला फ्युज टाकत असताना करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री सातच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे सर्वत्र एकच हळूहळू व्यक्त केली जात आहे.
    धारूर तालुक्यात असणार्‍या भोगलवाडी येथील तरुण संतोष मुंडे यांनी कोरोना संक्रमणाच्या काळात टिक टॉक स्टार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. संतोष मुंडे याचे महाराष्ट्रभर मोठे फॉलोवर्स आहेत. शेतातील विद्युत पुरवठा करणार्‍या डीपीचा गेलेला फ्युज टाकण्यासाठी टिक टॉक स्टार संतोष मुंडे आणि त्याच्यासह बाबुराव मुंडे हे शेतात गेले असता अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने करंट लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला. तपासणीसाठी तेलगाव येथील रुग्णालयात घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदरील घटना समजताच समाज माध्यमावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
Tagged