PANKAJA MUNDE

पंकजा मुंडे यांचे गोपीनाथ गडावर अर्धातास मौन

न्यूज ऑफ द डे परळी बीड

महापुरुषांच्या अवमानाचा नोंदवला निषेध

परळी : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज सोमवारी गोपीनाथ गडावर अर्धातास मौन पालन केले.

महापुरुषांच्या अवमानप्रकरणी त्यांनी अनोख्या मार्गाने निषेध नोंदवला. गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे या गोपीनाथ गडावर पोहचल्या. तिथे त्यांनी अर्धातास मौन पाळले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग गडावर दर्शनासाठी येत आहे. महापुरुषांच्या अवमान प्रकरणी राज्यातले राजकारण चांगलेच पेटले आहे.

Tagged