anil deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन, मात्र….

क्राईम न्यूज ऑफ द डे

१०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीचे प्रकरण

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला पण सीबीआयच्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे.

देशमुखांना जामीन मंजूर केल्याच्या न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे देशमुखांच्या जामिनाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावलर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. तेरा महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे, मात्र सध्या अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे 10 दिवस देशमुखांचा मुक्काम तुरुंंगातच असणार आहे.

Tagged