वडवणीच्या महाराणी ताराबाई शाळेतील दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

वडवणी- येथील महाराणी ताराबाई विद्यालयातील दोघा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे आजपासून ही शाळा शासन निकषाप्रमाणे बंद ठेवण्यात आली आहे.


या शाळेतील 7 व्या इयत्तेत शिकणारी मुलगी आणि इयत्ता 10 व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी हे दोघेही सख्खे भाऊ-बहीण पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. हे कुटुंब बाहेरून आलेलं असून त्या कुटुंबातील वडील पॉझिटिव्ह आलेले होते. त्यानंतर याची लागण मुलांना झाली. काल त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. आज ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न होताच शाळा सोडून देण्यात आली. शासन नियमाप्रमाणे शाळा आता काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आज सहा पॉझिटिव्ह
बीडमध्ये आज सहाजण पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. तर काल 11 जण पॉझिटीव्ह आढळून आले होते. बीड जिल्ह्यात एकूण 57 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

Tagged