corona

तुम्हाला महितीयेत का जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण किती?

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

बीड– बीड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून कोरोना रुग्णांत मोठी घट झाली आहे. आता हा आकडा जवळपास एक आकडी आला आहे.

जिल्हा प्रशासनाने आज जाहीर केलेल्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात केवळ सहा रुग्ण आढळून आले आहेत. आज एकूण 360 जणांचे नमुने अंबाजोगाईच्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. जिल्ह्यातील धारूर परळी तालुक्यात प्रत्येकी दोन तर आष्टी आणि गेवराई तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. तसेच जिल्ह्यात 59 रुग्णावर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 2816 लोकांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Tagged