मुंबई, दि. 5 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलैला होणार आहे. नव्या मंत्रीमंडळात 22 ते 28 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती विविध वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.
नरेंद्र मोदी मे 2019 मध्ये दुसर्यांदा सत्तेवर आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात एकूण 53 मंत्र्यांना शपथ दिलेली होती. आता नव्याने 28 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून हिना गावीत आणि नारायण राणे ही दोनच नावे चर्चेत आहेत.
2019 साली सरकार स्थापन करताना भाजपसोबत असणारे काही पक्ष आता साथ सोडून गेले आहेत. शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांनी एनडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांच्या निधनामुळंही एक मंत्रीपद रिक्त झालं आहे. या जागेवर नव्या चेहर्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. काही विद्यमान मंत्र्यांना खाती बदलून दिली जातील, अशीदेखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.