‘त्या’ अपघातग्रस्त एसटी चालकाचे मेडिकल केलेच नव्हते!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाईच्या अपघाताची धक्कादायक माहिती समोर

बीड : एकीकडे गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी कामगार परतले असून एसटी बस सुरू झाली आहे. पण, अशातच जिल्ह्यात रविवारी एसटी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जणांना आपला जीव गमाववा लागला. यामध्ये एसटीचे कर्मचारी मयत झाले. या अपघातातील धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  औरंगाबाद आगर 1 मधून एमएच-20-बीएल-3017 ही गाडी लातूरकडे रवाना झाली. चालक म्हणून जखमी सुभाष गायकवाड बिल्ला क्रमांक 25049 आणि वाहक म्हणून चंद्रकांत पाटील जे दुर्दैवाने या अपघातात मयत झाले. तर अपघातातून बचावलेले चालक सुभाष गायकवाड यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया धक्कादायक आहे. एसटीचा चालक 30 दिवसांपेक्षा जास्त कामावर नसेल तर तो चालक जेव्हा कामावर हजर होईल, तेव्हा त्याला मेडिकल चाचणीतून जावे लागते. मेडिकल प्रमाणपत्र असल्याशिवाय त्याला कामावर हजर करून घेतले जात नाही. मात्र अपघातग्रस्त गाडीचे चालक गेल्या अडीच महिन्यांपासून कामावर नव्हते मग त्यांची मेडिकल चाचणी का केली गेली नाही? असा सवाल उपस्थितीत झाला आहे. चालक सुभाष गायकवाड यांना मेडिकल प्रमाणपत्राशिवाय गाडी कशी चालवायची परवानगी दिली? सुभाष गायकवाड यांना लांब पल्ल्याची एसटी चालवण्याचा अनुभव नसताना का लातूरला पाठवले? सुभाष गायकवाड शहरात डेपो ते एसटी बसस्थानक सामान घेऊन जाणार्‍या एसटी ट्रॅकचे चालक मग त्यांना एसटी चालवण्यास कुणी दिली, असा सवाल कामगारांनी उपस्थितीत केला आहे.

Tagged