तब्बल 27 उच्च पदस्थ महिलांसोबत लग्न
भुवनेश्वर : एक-दोन नाहीतर तब्बल 27 वेळा लग्न करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओडिशा पोलिसांनी एका 60 वर्षीय व्यक्तीला अटक केली असून त्याने तब्बल 10 राज्यांतील 27 महिलांसोबत लग्न केल्याचं आणि पैसे देखील उकळल्याचे उघडकीस आलं आहे. इथं घोडनवरदेवांचे आणि पोट्ट्यांचे एक लग्न होईना अन् 60 वर्षाच्या म्हातार्याने लफडे करण्याची मालिकाच सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बिभू प्रकाश स्वैन असे आरोपीचे नाव असून तो ओडिशातील केंद्रापाडा जिल्ह्यातील पाटकुरा येथील रहिवासी आहे. स्वेनने 10 राज्यांतील 27 महिलांशी लग्न केले. 2006 मध्ये त्याने केरळमधील 13 बँकांची 128 बनावट क्रेडिट कार्डद्वारे 1 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. हैदराबादमध्ये त्याने मुलांना एमबीबीएसच्या जागा मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची 2 कोटीने फसवणूक केली होती. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या सहाय्यक कमांडोपासून ते छत्तीसगडचे चार्टर्ड अकाउंटंट, नवी दिल्लीतील शाळेतील शिक्षक, आसाममधील तेजपूर येथील डॉक्टर, सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे दोन वकील, इंदूर येथील सरकारी कर्मचारी, केरळ प्रशासकीय विवाहित अशा उच्च पदस्थ महिलांसोबत स्वेनने लग्न केले. यासाठी त्याने गशर्शींरपीरींहळ.लेा, डहररवळ.लेा, इहरीरीांरीींळोपू.लेा सारख्या मॅट्रिमोनिअल साइट्सचा वापर केला.
50-70 लाख पगाराचं आमिष
स्वेनने स्वतः प्राध्यापक असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्याने आरोग्य शिक्षण आणि प्रशिक्षण उपमहासंचालक हे पद देखील स्वतःच्या प्रोफाईलमध्ये लिहिलं होतं. तसेच वार्षिक 50 ते 70 लाखांचं उत्पन्न असल्यांचं सांगितलं होतं. इतकंच नाहीतर सध्या नीट यूजी आणि पीजी प्रवेश परीक्षांचे मुख्य नियंत्रक म्हणून नियुक्ती केली असून कुटुंबाची काळजी घेणार्या आणि सुशिक्षित महिलेच्या शोधात असल्याचं त्यानं मॅट्रीमोनी साईट्सवरील प्रोफाईलमध्ये लिहिलं आहे. आरोपी तरुण दिसत असला तरी त्याचे वय 60 पेक्षा जास्त आहे. पण, सरकारी नोकरीमुळे पीडितांनी त्याच्या वयाकडे दुर्लक्ष केले. स्वेनने महिलांच्या असहायतेचा पुरेपूर फायदा घेतला आणि मोठा सापळा रचला. त्याने पीडितेकडून किती पैसे कमावले याचा शोध घेणे अद्याप बाकी आहे. प्राथमिक तपासात त्याने 2-10 लाख रुपये जमा केले असावेत, असा अंदाज आहे. पण पैशासाठीच त्यानं लग्न केलेत, असं पोलिस उपायुक्त उमाशंकर दास यांनी सांगितलं.
1982 मध्ये पहिलं लग्न
आरोपीने 1982 मध्ये पहिले लग्न केले होते आणि 2002 मध्ये दुसरे लग्न केले होते. या दोन्ही लग्नातून त्यांना पाच मुले होती. दास यांनी सांगितले की, 2002 ते 2020 या काळात त्याने मॅट्रीमोनी वेबसाइटच्या माध्यमातून इतर महिलांशी मैत्री केली आणि पहिल्या पत्नींना न सांगता या महिलांशी लग्न केले. सध्या तो भुवनेश्वर येथे दिल्लीतील शाळेत शिक्षिक असलेल्या त्याच्या शेवटच्या पत्नीसोबत राहत होता, असंही दास यांनी सांगितले.
घटस्फोटित महिला बळी
आरोपी मॅट्रीमोनी साईटवरील मध्यमवयीन अविवाहित महिलांना, विशेषत: घटस्फोटित महिलांना लक्ष्य करायचा. या महिलांना सोडण्यापूर्वी तो त्यांच्याकडे असलेले पैसे लुटत होता. एका विमानतळावर फसलो आहे, असं सांगून तो पत्नीकडून पैसे मागवायचा आणि कधीच परतायचा नाही. त्यानंतर दुसर्या महिलेसोबत लग्न करायचा, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिस आरोपीकडून 11 एटीएम कार्ड, चार आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत.
प्रकरणाचा पर्दाफाश कसा झाला?
पोलिसांनी सांगितले की, एका शाळेच्या शिक्षिकेने गेल्या वर्षी जुलैमध्ये महिला पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर ही बाब उघडकीस आली. आरोपीने तिच्याशी 2018 मध्ये नवी दिल्ली येथे लग्न केले आणि तिला भुवनेश्वरला नेले. महिलेला आरोपीने अनेक विवाह केल्याची माहिती मिळाली आणि तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. बेरोजगार तरुणांची फसवणूक आणि कर्ज फसवणूक केल्याप्रकरणी त्याला हैदराबाद आणि एर्नाकुलम येथे यापूर्वी दोनदा अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.