अर्धवट रस्ते कामाचा आणखी एक बळी

अंबाजोगाई कोरोना अपडेट देश विदेश

मोरेवाडीत अपघातात तरुण जागीच ठार

अंबाजोगाई : अर्धवट रस्त्याच्या कामाने आणखी एकाचा बळी घेतला आहे. शहरातील पाण्याच्या टाकी मोरेवाडी येथे स्विफ्ट कार सिमेंट नालीच्या बांधकामाला धडकून चालक ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.२१) मध्यरात्री साडेअकरा वाजता घडली.

निलेश मधुकर पवार (वय २२, रा.मोरेवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मोरेवाडी येथील पाण्याची टाकी परिसरात सिमेंट रस्त्याचे व नालीचे काम सुरू आहे. अर्धवट झालेल्या नालीच्या बांधकामाला भरधाव वेगातील कार नियंत्रण सुटल्याने जोरात धडकली. दरम्यान, गेली 2 वर्षापासून रस्ता उखडून ठेवल्याने आणि रस्त्याचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत असल्याने अपघातांची मालिका सुरुच आहे.

Tagged