accident

टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड


गेवराई  दि.25 : गेवराई शहराजवळील विठ्ठलनगर येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.25) सायंकाळच्या सुमारास घडली.
बाबासाहेब तुळशीराम सौंदलकर (वय 55 रा.रेवकी ता.गेवराई), गोरख लिबांजी शेंडगे (वय 45 रा.रेवकी ता.गेवराई) अशी अपघातातील मयताची नाव आहे. ही दोघे दुचाकीवरुन गेवराईवरुन विठ्ठलनगर येथे घरी जात होते. यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पोने समोरासमोर जोराची धडक दिली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. बाबासाहेब सौंदलकर हे रेवकी येथील माजी सरपंच होते.

Tagged