किल्ले धारूर /सचिन थोरात
तालुक्यातील पांगरी येथे अरूणाबाई लक्ष्मण थोरात यांच्या शेतात असलेल्या विहिरीवर बसवण्यात आलेल्या सोलर पंपाची अज्ञाताने मोडतोड करत नुकसान केली आहे. यामुळे येथील शेतकऱ्या समोर नवीन संकट उभे राहिले आहे.

तालुक्यातील पांगरी येथील अरूणाबाई लक्ष्मण थोरात यांच्या शेतातील सर्वे नंबर 121 मधील विहिरीवर मुख्यमंत्री सोलर योजनेतून बसवण्यात आलेल्या सोलर पंपाची कटरच्या साह्याने वायर कट करत मोडतोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञाताने केलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभा राहिल आहे. शेतात असणारा गहू हरभरा ज्वारी भिजवण्यासाठी या सोलार चा वापर केला जात होता.सतत विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे तसेच शेतकऱ्यांना विद्युत पंप चालवण्यासाठी पुरेसा विद्युतदाब उपलब्ध होत नसल्याने भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री फडणविस यांनी सोलार योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनेमध्ये अरूणाबाई थोरात यांनी शेतात सोलार बसवले होते. या सोलारची जाणीवपूर्वक करण्यात आलेली नुकसान शेतकऱ्यांसाठी धक्कादायक प्रकार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाला आहे.