atyachar

आणखी एका बलात्काराच्या आरोपाने बीड हादरले

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र


बीडः बीड जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपाधिक्षकाविरुध्द मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलीसातिलच एका सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलीसातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या महिलेने पोलीस वाळके उपाधिक्षकाविरुध्द फिर्याद दिली होती. या तक्रारिची विशाखा समितीने चौकशी केली. त्यानंतर मुंबईच्या रफी अहमद किडवइ मार्ग पोलीस ठाण्यात संतोष वाळके यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सदर पोलीस उपाधिक्षक सध्या बीड जिल्ह्यात कार्यरत आहेत.

Tagged