acb trap

ग्रामसेवकासह खाजगीइसम एसीबीच्या जाळ्यात!

बीड

बीड दि. 15 : दुधाळ गट योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या गाई गावात दाखल झाल्याची ग्रामपंचायतला नोंद करण्यासाठी ग्रामसेवकाने तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम ग्रामसेवकाच्या सांगण्यावरून खाजगी इसमाने स्वीकारली. बीड येथील जुनी पंचायत समितीच्या आवारातील हॉटेलात सोमवारी (दि.15) दुपारी ही कारवाई करण्यात आली. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beed acb trap news)

ग्रामसेवक हरिभाऊ रामभाऊ केदार (वय 51, रा.धांडेनगर, बीड) (gramsevak haribhau kedar) व खाजगी इसम गणेश तुकाराम माने (वय 41, रा.ताडसोना ता.बीड) अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार यांचे सासूचे नावे नाविन्य पूर्ण योजना सन 2022 -2023 (दुधाळ गट) अंतर्गत दोन गायी मंजूर झाल्या. या योजने अंतर्गत तक्रारदार यांचे सासुने सदर दोन गाई खरेदी केल्या होत्या. सदर गाई दुधाळ गट योजने अंतर्गत गावात दाखल झाल्याच्या प्रमाणपत्रावर सही करून याची नोंद ग्रामपंचायतीने ठेवलेल्या गावातील पशुधनाच्या नोंदवहीत घेण्यासाठी यातील लोकसेवक यांनी पंचासमक्ष तीन हजार रुपये लाचेची मागणी करून ते पंचासमक्ष
लोकसेवकाच्या सांगण्यावरून खाजगी इसमाने स्वीकारले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कार्यारंभ दोघे आरोपी पोलिसांनी अटक केली आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक राजीव तळेकर, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान गोरे, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे यांनी केली.

beed acb news

Tagged