corona-swab

गेल्या चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोना अपडेट महाराष्ट्र

राज्यात आज कोरोनाच्या ५ हजार ३६८ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई : राज्यात गेल्या चार दिवसापांसून दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने केवळ चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. आज ३५२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख १५ हजार २६२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.३७ टक्के एवढे आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ५३६८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८७ हजार ६८१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख ३५ हजार ४४७ नमुन्यांपैकी २ लाख ११ ९८७ नमुने पॉझिटिव्ह (१८.६७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख १५ हजार २६५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ३५५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.