corona

बीड जिल्ह्यात पुन्हा तीन पॉझिटीव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

परळीच्या एसबीआय शाखेशी संबंधीत संशयित आले पॉझिटीव्ह

प्रतिनिधी । बीड
दि. 6 ः बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या 197 स्वॅबपैकी 3 नमुने पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर 8 नमुने अनिर्णित आहेत. 186 जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.


आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये परळीच्या एसबीआय शाखेच्या संपर्कातील 34 वर्षीय पुरुष, धारूर शहरातील अशोक नगर भागातील 10 वर्षीय मुलगा आहे. तो मुंबईहून आला आहे. तर तिसरा रुग्ण हा अंबाजोगाई शहराजवळील मोरेवाडी येथील 45 वर्षीय पुरुष आहे. तोही एसबीआय बँक परळीचा कर्मचारी असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

Tagged