रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी

घाटनांदूर येथील घटना

घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.२२) मध्यरात्री घडली.

बालासाहेब योगा मिसाळ (वय ५४, रा.घाटनांदूर) असे मयताचे नाव आहे. त्यांचा अंबाजोगाई- अहमदपूर महामार्गावरील घाटनांदूर येथील रेल्वे फाटकाच्या नजीक रात्री उशिरा रेल्वे खाली चिरडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र हा अपघात आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस पवार, बाबासाहेब फड, खुद्दुस शेख हे करत आहेत.

Tagged