दहा हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडला!

क्राईम धारूर न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.22 : गुन्ह्यात मदत करण्यासाठी एका पोलीस कर्मचार्‍याने लाचेची मागणी केली. तडजोडअंती दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना त्यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.22) सायंकाळच्या सुमारास धारुर तालुक्यात करण्यात आली. विशेष म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्ह्यात असताना ही कारवाई झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

तेजस वाहुळे असे पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. धारुर पोलीस पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदारास गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना केज तालुक्यातील आडस परिसरात बीड एसीबीच्या टिमने रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्ह्यात असताना ही कारवाई झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या टिमने केली.

Tagged