dastgir shaikh

उपसा सिंचन योजनेच्या खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू

क्राईम माजलगाव

पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणाचा बळी

माजलगाव, दि.23 : शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी कॅम्प येथील हनुमान मंदिराजवळ एका खड्ड्यात पडून दस्तगीर बिलाल शेख (वय 15 वर्षे) या युवकाचा मृत्यू झाला ही घटना रोजी सकाळी दहाच्या दरम्यान घडली. पांटबंधारे विभागाच्या हालगर्जीपणा चा बळी गेल्याचे बोलले जात आहे.

तालुक्यातील सादोळा जलसिंचन उपसा योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम चालू आहे. या कामासाठी केसापूर येथील हनुमान मंदिराजवळ एक मोठा खड्डा खोदला होता या खड्ड्यामध्ये पाईपलाईन चे पाणी साचले होते. या खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने केसापुरी येथील नुकताच दहावी परिक्षा दिलेला युवक दस्तगीर बिलाल शेख याचा पाय घसरून बुडून मृत्यू पावल्याची घटना सोमवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडली या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tagged