माजलगाव दि.6 : सेवाजेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद बीड येथे पाठवून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना माजलगाव पंचायत समिती समोर सोमवारी (दि.6) दुपारी रंगेहात पकडले.
रामचंद्र होनाजी रोटेवाड ( वय 30, विस्तार अधिकारी, ( ग्रामपंचायत विभाग), पंचायत समिती माजलगाव) असे लाचखोर विस्तार अधिकारी यांचे नाव आहे. तक्रारदार हे ग्रामपंचायत केसापुरी येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे 10 वर्षे पूर्ण झालेने सेवाजेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद बीड येथे पाठवून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 10 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. सोमवारी माजलगाव येथे पंचायत समितीचे समोर पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वता: पंच साक्षीदार समक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड पोलिस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, पोअंम. भरत गारदे, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी यांनी केली.