जेसीबीखाली चेंगरून बापाचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर

क्राईम गेवराई

जातेगाव : गेवराई तालुक्यातील मारफळा तांडा येथील शेतात पाईपलाईनचे काम चालू असताना बाजूला झोपलेल्या बाप लेकाच्या अंगावर जेसीबी गेल्याने यात बापाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.7) मध्यरात्री घडली. कल्याण विशाखापट्टनम महामार्गावर असलेल्या मारफळा तांडा येथील अंकुश राठोड यांच्या शेतात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने पाईपलाईन खोदण्याचे काम सुरू होते. साहेबराव रूपा राठोड व त्यांचा मुलगा मनोज राठोड हे बाजूला जाऊन झोपले होते. मात्र काम चालू असताना चालकाच्या लक्षात न आल्याने ते दोघेही जेसीबीच्या खाली आले यात साहेबराव रूपा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा मनोज साहेबराव राठोड गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी तलवाडा पोलीस दाखल झाले असून जेसीबी चालक जेसीबी घेऊन फरार झाला आहे.

Tagged