वैतागवाडीत नवदाम्पत्याची गळफास घेवून आत्महत्या!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


मयत महिला होती सात महिन्याची गर्भवती


नेकनूर
दि.16 : बीड तालुक्यातील नेकनूर येथून जवळच असलेल्या वैतागवाडीमध्ये एका नवंदाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.16) समोर आली आहे. मयत महिला ही सात महिन्याची गर्भवती असल्याने खळबळ उडाली असून रात्री उशीरापर्यंत आत्महत्यामागचे कारण समोर आले नव्हते. नेकनूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.


नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वैतागवाडी येथे राजेश जगदाळे (वय-25) व त्यांची पत्नी दिपाली राजेश जगदाळे (वय-20) या दाम्पत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून राजेश आणि दीपालीचा 11 महिन्यापूर्वी विवाह झाला होता. दीपाली ही सात महिन्याची गर्भवती असल्याची माहिती असून आत्महत्यामागचे कारण रात्री उशिरापर्यंत समोर आले नव्हते. मृतदेह रात्री उशीरा उत्तरीय तपासणीसाठी नेकनूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते.

11 महिन्यांपूर्वी झाला होता विवाह
राजेश आणि दिपालीचा विवाह 11 महिन्यांपूर्वीच झाला होता. गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास या दोघांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. यावेळी राजेशचे आई वडील शेतात काम करत होते. आणि हे दोघेच घरी होते. या दोघांमध्ये कधीही वाद झाले नाही मात्र तरीही राजेश आणि दिपालीने उचललेल्या टोकाच्या पाऊलामुळे नेकनूर परिसरात खळबळ उडाली आहे.

पत्नीला गळा दाबून मारले, नंतर स्वतः घेतला गळफास

Tagged