पत्नीला गळा दाबून मारले, नंतर स्वतः घेतला गळफास

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


वैतागवाडी येथील घटनेचा उलगडा

काय आहे वैतागवाडी येथील घटनेचा उलगडा इथे क्लिक करा वाचण्यासाठी


नेकनूर दि.17 : बीड तालुक्यातील वैतागवाडीमध्ये पती-पत्नीचा मृतदेह घरामध्ये गुरुवारी (दि.17) रोजी आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. शुक्रवार (दि.17) रोजी मृतदेहांचे उत्तरीय तपासणी अहवाल पोलिसांना मिळाला असून, यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधी पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती नेकनूर पोलिसांनी दिली आहे.


नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वैतागवाडी येथे राजेश जगदाळे (वय-25) व त्यांची पत्नी दिपाली राजेश जगदाळे (वय-20) या दाम्पत्याचे मृतदेह राहत्या घरात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. नेकनूर पोलिसांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्याचे अहवाल शुक्रवारी आले असून यात दीपालीचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेशने आधी दीपालीचा खून केला आणि नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली असे म्हटले आहे. याप्रकारणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. पती-पत्नीच्या वादामधून हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात अहे. दीपालीचा 11 महिन्यापूर्वी विवाह झाला होता आणि ती सात महिन्याची गर्भावती ही होती. त्यामुळे वैतागवाडी ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tagged