‘येडेश्वरी’ कारखान्याचा ऊस बिलाचा दुसरा हप्ता जमा; सर्वाधिक भाव दिला……

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

चेअरमन बजरंग सोनवणे यांनी शब्द पाळला

केज : तालुक्यातील आनंदगाव (सा.) येथील येडेश्वरी साखर कारखान्याने गुरुवारी (दि.15) ऊस बिलाचा दुसरा हप्ता 100 रूपयांप्रमाणे शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.

येडेश्वरी कारखाना हा तालुक्यातील व व कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करून वाटचाल करीत आहे. गत हंगामात तालुक्यात अतिरिक्त ऊस असल्याने आपला ऊस शिल्लक राहतो की काय? अशी भीती शेतकर्‍यांमध्ये होती. मात्र कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप करून कारखाना बंद केला. कारखान्याने सर्वाधिक भाव दिला असून यापुढे ही शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन कारखाना यशस्वीरित्या चालवला जाईल, असे येडेश्वरी साखर कारखाना चेअरमन बजरंग सोनवणे यांनी सांगितले. कारखान्याने सन 2022-2023 च्या नवव्या गळीत हंगामात उसाला 2 हजार 450 रुपये भाव देत चेअरमन बजरंग सोनवणे यांनी शेतकर्‍यांना दिलेला शब्द पाळला. कारखान्याने यापूर्वी 2 हजार 450 रुपयांचा पहिला दिला. त्यानंतर आता गुरुवारी 100 रुपयांप्रमाणे दुसरा हप्ताही शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. त्यामुळे आता एकूण 2 हजार 550 रुपये बिल झाले असून शेतकर्‍यांनी चेअमरन बजरंग सोनवणे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, हा भाव परिसरातील कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

Tagged