fire

बीडमध्ये दोन गटामध्ये राडा; गोळीबारात चारजण जखमी

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


आसाराम गायकवाडला अटक, गावठी कट्टा जप्त
बीड दि.16 : शहरातील कालिकानगर भागात शुक्रवारी (दि.16) रात्री 10.30 च्या सुमारास दोन गट आमने-सामने आले. यावेळी एका गटाकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात चारजण जखमी झाले असून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा मामा-भाचे गँगचा वाद असल्याची चर्चा आहे. गोपाळ भिसे, मनिराम गायकवाड यांना गोळी लागली आहे. तर मारोती गायकवाड, नारायण गायकवाड या दोघांवर तलवारीचे वार करण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांनी आसाराम गायकवाड यास ताब्यात घेतले असून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

शहरातील कालिकानगर जवळील नगद नारायण बँकेसमोर दोन गट आमने सामने आले. यावेळी आसाराम गायकवाडच्या गटाने गोळी झाडली असल्याची माहिती आहे. रात्रीच्या वेळी कालिकानगर भागात दोन्ही गटाचे जवळपास 100 जण आमने सामने येत गोळीबार केला. या घटनेमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Tagged