बीडमध्ये वजनमापे निरीक्षक व्यापार्‍यांना लुटून स्वतःचे घर भरू लागले!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

पैसे घेतल्याचा जाब विचारल्यानंतर निरीक्षक गणेश मिसाळची बोबडी वळाली


केशव कदम
बीड
BEED दि.17 : प्रत्येक दुकानात, मॉलमध्ये जावून वजनमापे निरीक्षक गणेश मिसाळ (ganesh misal) हे व्यापार्‍यांची लूट करत असल्याचे दिसत आहे. शनिवारी (दि.17) शहरातील आदर्श मार्केट मॉलमध्ये (adarsh market mall) त्यांना व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी तोंडावर शिव्यांची लाखोळी वाहत लुटीबाबत जाब विचारला. यावेळी निरीक्षक गणेश मिसाळची उत्तर देताना बोबडी वळाली होती. तसेच मॉलमधील लोकांसमोर खाली मान घालावी लागली. अशा अधिकार्‍यांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी महासंघाचे संतोष सोहणी, (santosh sohani), विनोद पिंगळे (vinod pingle) यांनी केली आहे. (The weighing officers started robbing the traders)

पॅकेज्ड खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर उत्पादनाची तारीख, उत्पादन करणार्‍याचे नाव, ते किती दिवस खाण्यास योग्य, पाकिटावरील वजन आणि प्रत्यक्षात वजन, वस्तूवर मुळ किंमत स्पष्ट आहे का, वजन काटे यासह इतर बाबीवर वजनमापे विभागाचे लक्ष असते. मात्र बीड येथील वजनमापे निरीक्षक यांचे फक्त वसुलीवर लक्ष असल्याचे दिसत आहे. येथील वजन व मापे कार्यालयाचा अतिरिक्त पदभात छत्रपती संभाजीनगर येथील वजनमापे निरीक्षक गणेश मिसाळ यांच्याकडे आहे. मागील आठवडाभरापासून शहरातील व्यापार्‍यांवर त्यांच्या पथकाकडून कारवाया सुरु आहेत. प्रत्येक दुकानात जावून फक्त त्रुटी काढत हे महाशय ‘वसुली’ करत आहेत. शनिवारी (दि.17) शहरातील आदर्श मार्केट या मॉलमध्ये या पथकाने तपासणी केली. त्याआगोदर त्यांनी काही व्यापार्‍यांकडून पैसे गोळा केल्याची माहिती आहे. त्यातीलच एक काजु विक्रेता त्याच्याकडून चार हजार उकळले. त्यामुळे व्यापार्‍यांनी आदर्श मार्केट येथे वजनमापे निरीक्षकासह त्यांच्या पथकाला घेराव घातला. घेतलेल्या पैशाचे कारण विचारले. तसेच व्यापारी महासंघाचे संतोष सोहणी यांनी व्यापार्‍यांच्या लुटीबद्दल अक्षरशः तोंडावर शिव्यांची लाखोळी वाहिली. परंतू मोठ्या प्रमाणात बीडमध्ये पैसा गोळा केलेला असल्यामुळे निरीक्षक मिसाळ यांनी काहीही प्रत्युत्तर दिले नाही. यावेळी वजनमापे विभागातील अमोल ढवळे, जी.एस.लोंढे, बी. डी.भोसले हे पथकात सहभागी आहेत.

काजु-बदाम विक्रेत्याकडून चार हजार घेतले
14 जून रोजी शहरातील कुबेर ड्रायफूटचे धीरज लड्डा यांच्या दुकानात जावून निरीक्षक मिसाळ यांनी पाहणी केली. यावेळी त्यांना काँन्टरवर असलेल्या कॅलकेल्युटरमध्ये 10 हजार रुपयांचा आकडा टाईप केला व एवढे लागतील म्हणून सांगितले. पंरतू त्यांनी भीतीपोटी एवढे पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर चार हजार रुपये घेवून बाहेर ये असे म्हटले. या दुकानदाराने चार हजार रुपये दिले. हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्हीत कैद झालेला आहे.

सगळे बीडशहर पालते घातले
अन् दोघा- तिघांवर कारवाई

या वजनमापे पथकाने मागील आठवडाभरात पूर्ण शहर कारवाईच्या निमित्ताने पालते घातले. परंतू फक्त महिंद्रा शोरुम, नगर नाक्यावरील बीएस ग्रुपच्या फस्टक्राय दुकान येथे त्रुटी आढळून आल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अहवाल तयार केल्याचे वजनमापे निरीक्षक गणेश मिसाळ यांनी सांगितले.

बीडमध्ये काही ठिकाणी कारवाया केल्या आहेत. काजु-बदाम व्रिकेत्यावर काय कारवाई केली ते आठवत नाही. परंतू तिथे तपासणी केली होती. मात्र त्याने विनंती केल्यामुळे त्याला सोडून दिले.
-गणेश मिसाळ, वजनमापे निरीक्षक, बीड

व्यापारी महासंघ जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार
या संदर्भात व्यापार्‍यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने त्या व्यापार्‍यांना घेवून सोमवारी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांची भेट घेणार आहोत. तसेच संबंधित अधिकार्‍याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे व्यापारी महासंघाचे संतोष सोहनी, विनोद पिंगळे यांनी सांगितले.

Tagged