ajit pawar

सारथीला आठ कोटींचा निधी

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मुंबई, दि. 9 : मराठा समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सुरु करण्यात आलेल्या सारथी संस्थेला आठ कोटी रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawarयांनी केली आहे. हा निधी उद्याच सारथीला वितरीत केला जाईल, अशी दणकेबाज घोषणाही पवार यांनी केली. त्यामुळे सारथी बंद होणार या उठलेल्या वावड्यांना आता पुर्णविराम लागणार आहे.

मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, स्वायत्ता आणि गैरव्यवहारावरून ही संस्था चर्चेत आहे. यावरून राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे हा वाद चिघळला होता. या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करत बैठक बोलावली होती. या बैठकीली छत्रपती संभाजीराजे भोसले sambhajiraje bhosale, विजय वडेट्टीवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. याबैठकीत संस्थेच्या विविध समस्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सारथी संस्था बंद होणार नाही. मागील काही काळात गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये चुकीचा मेसेज गेला होता. मात्र, हे होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात येईल. त्याचबरोबर सारथीला उद्याच विजय वडेट्टीवार हे आठ कोटी रुपयांची मदत देतील, असं अजित पवार म्हणाले.

छत्रपतींना तिसर्‍या रांगेत स्थान

पूर्वनियोजित वेळेनुसार मंत्रालयात ही बैठक सुरू झाली. पहिली बैठक ही सर्व प्रतिनिधींसोबत होणार होती. अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, शिवसंग्रामचे विनायक मेटे, vinayak mete मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील व मराठा क्रांती मोर्चाचे विरेंद्र पवार हे देखील बैठकीला उपस्थित होते. मात्र, बैठकीच्या सुरुवातीलाच आसन व्यवस्थेवरून गोंधळ सुरू झाला. व्यासपीठावर अजित पवार, विजय वडेट्टीवार व नवाब मलिक हे बसले होते. तर, संभाजीराजे हे तिसर्‍या रांगेत बसले होते. त्यामुळं कार्यकर्ते अस्वस्थ झाले.
छत्रपतींचा हा अपमान आहे. छत्रपतींना तिसर्‍या रांगेत बसवून तुम्ही खुशाल व्यासपीठावर कसे बसता,’ असा प्रश्न एका कार्यकर्त्यानं मंत्र्यांना केला. अजित पवार यांनी यात मध्यस्थी करत संबंधित कार्यकर्त्यास शांत राहण्यास सांगितलं. ’तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत की वाढवायचे आहेत? हे मंत्रालय आहे,’ असं अजित पवार म्हणाले.
अखेर संभाजीराजे यांनी मध्यस्थी केली. मी बाहेर जाऊ का, असा प्रश्न त्यांनी गोंधळ घालणार्‍या कार्यकर्त्यांना विचारला. तरीही कार्यकर्ते शांत बसले नाहीत. ’छत्रपतींना खाली बसायला लावलं असताना तुम्ही काय करत होता, असा प्रश्न लोक आम्हाला विचारतील. तोंड दाखवायला जागा राहणार नाही,’ असं कार्यकर्ते म्हणाले. मात्र, संभाजीराजे यांनी समजावल्यानंतर ते शांत झाले. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील चर्चा अजित पवार यांच्या दालनात घेण्याचा निर्णय झाला.

Tagged