atyachar

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड

आरोपी पतीपत्नीस संभाजीनगर
पोलीसांनी केले गजाआड

 परळी : येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात 16 वर्षीय मुलगी मिसींग असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. सदरील मुलगी परभणी येथून संभाजीनगर पोलीसांना आढळून आली. यावेळी तिच्याकडे चोकशी केली असता तिला लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची कबुली दिली. या प्रकरणी आरोपी पतीपत्नीस संभाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

  16 वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची मुलीच्या नातेवाईकांनी संभाजी नगर पोलीस ठाणे येथे मिसिंग फिर्याद दाखल केली होती. या तपासकामे संभाजीनगर पोलीस मिसिंग झालेल्या मुलीची माहिती मिळताच परभणी या ठिकाणी गेल्यानंतर मुलगी मिळून आली. यावेळी तिच्यावर अत्याचार केला असल्याचे पीडितेने सांगितले. तिने जवाबात म्हटले आहे की, नासिर पाशा पठाण, याने माझ्या सोबत बळजबरी शारीरिक संबंध करत बलात्कार केला. यामध्ये त्याची पत्नी आरशा नासिर पठाण दोघांनी संगनमत करून माझे अपहरण केले व माझ्याबत बळजबरीने अनेक वेळा आरोपी नसिर याने अत्याचार केले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 363, भादवि 366, अ 376, प 506, भादवी सह कलम 48 पोस्को या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास संभाजी नगर पोलीस स्टेशनचे बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.चांद मेंडके हे करीत आहे.

Tagged