ब्रेकिंग न्यूज : लॉकडाऊनबाबत ‘हा’ मोठा निर्णय

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा

महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव तीव्र असून तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासन निर्बंध कायम ठेवत आणखी १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याच्या तयारीत आहे. याबाबत राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याचे ही सांगण्यात आले असून अधिकृत घोषणा बाकी आहे.

मुंबई : महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन असूनही कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय आज (दि.२८) होण्याची दाट शक्यता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

Tagged