corona vaccine

‘या’ वयोगटातील सर्वांना मोफत मिळणार कोरोना लस

बीड

राज्य सरकारने घेतला निर्णय

मुंबई : राज्यातील १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. राज्य सरकारने आज (दि.२८) घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मत-मतांतरे दिसून आली. अखेर आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय झाला. यासाठी साधारणत: लसींचे १२ कोटी डोस लागतील. यामुळे राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा भार पडेल, असे सांगण्यात आले आहे.

Tagged