गुढ आवाजाने आवरगाव हादरले!

धारूर न्यूज ऑफ द डे बीड


ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
धारूर
दि.29 : धारुर शहरापासून चार किमी अंतरावर असणार्‍या आवरगाव येथे अचानक दहा वाजता जमिनीतून गुढ आवाज झाल्याने पूर्ण गाव हादरले आहे. पत्राची घरे आणि जूने मातीकाम असणार्‍या घरांच्या भिंतीला मोठ्याप्रमाणावर हादरे बसले आहेत. पूर्ण गावकरी एकत्र गावाच्या बाहेर रस्त्यावर जमा झाले असून प्रशासनास या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
धारुर तालुक्यातील आवरगाव येथे अचानक 10 वाजता जमिनीतून गुढ स्वरूपाचा मोठ्या प्रमाणावर आवाज झाल्याने गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. मागील चार दिवसांपासून तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आधीच जनजीवन विस्कळीत झाल असताना अचानक झालेल्या गुढ आवाजाचा गावकर्‍यांनी धसका घेऊन सर्व गाव रस्त्यावर येऊन सुरक्षित ठिकाणी थांबले आहे. सदरील घटनेची माहिती प्रशासनास देण्यात आलेली आहे. झालेला गुढ आवाज नेमका कशाचा आहे याचा अद्यापपर्यंत अंदाज लागू शकला नसल्याने भूकंप होतो की काय? या भीतीने गावकरी रस्त्यावर आले आहेत.


दहा वाजता मोठ्या प्रमाणावर जमिनीतून आवाज येऊन पूर्ण गाव हादरून गेले. सदरील आवाजाने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील लहान मुले व वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना घराच्या बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.

अमोल जगताप
सरपंच, आवरगाव

Tagged